शेतकरी

शेतकरी

गरिब असला ना तो तरी,
भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
मोडक्या असतात त्याच्या घराच्या भिंती,
पण त्याच्यामुळेच इतरांची घरे सुखानी उभी आहे.
इतरांकडे असतील महागडे कपडे पण,
त्याच्या अंगावरील फाटक्या कपड्यामुळेच, आज सगळ्यांची अंग झाकलेली आहेत.
दुष्काळ, गरीबी, जास्त पाऊस, गारपीट, यासारखी अनेक संकटे,
त्याच्या आयुष्यात आहेत पण,
या सगळ्यांसोबत लढण्याची क्षमता,
फक्त त्याच्यातच आहे.
मनात सगळ्यांविषयी आदर, संकटाशी लढण्याची ताकद, काळ्याआईची प्रामाणिकपणे सेवा करणारा, व सगळ्या जगाचे पोट भरणारा, माझा शेतकरी राजा,
प्रामाणिकपणे वागूनही का असं,
खडतर आयुष्य जगत आहे.


Comments

Popular Posts