महापुर
महापुर
रक्ताचे पाणी करून उभा केलेला संसार,
एकाच क्षणात उध्वस्त झाला.
ध्यानी मनी नसताना,
भयंकर महापुर आला.
गाई - गुरे सर्व काही,
पाऊस स्वतःसोबत घेऊन गेला.
कर्ज घेऊन वाढवलेल्या पिकाची,
नासाडी करुन गेला.
साचलेल्या पाण्यामुळे रोगराईने,
हाहाकार केला.
व त्यातच हा महापुर अनेकांचे,
जीवन संपवुन गेला.
आणि हा महापुर जाता जाता
राजकारणी लोकांना भांडायला,
एक विषय देऊन गेला.
Comments