दिवाळी प्रत्येकाचीच गोड असेलच असे नाही

आपण साजरी करतो,
साखरेची गोड दिवाळी,
पण साखर निर्माण करणारे,
उस तोडणी कामगारच,
आज कडाक्याच्या थंडीत,
उसाच्या फडात उभे आहेत.
दिवे पाहिजे आपल्याला,
घरातील अंधार दूर करण्यासाठी,
पण आपण दिवे खरेदी करताना,
तिथेही तडजोड करत असतो.
पण एखाद्या हाँटेलमध्ये गेल्यावर,
आपण असे का करत नाही.
दिवाळी म्हणजे आनंद,
मिठाईचा गोडवा,
पण प्रत्येकाची दिवाळी,
आपल्यासारखी असेलच असे नाही.


Comments

Popular Posts