संविधान दिन
भिमाच्या लेखनीने एक इतिहास रचला
संविधानरुपी ग्रंथ आमच्या हाती दिधला.
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता
यांचा अर्थ व महत्त्व यात वर्णिला.
सरकारने कारभार कसा करावा?
याचा बहुमोल संदेश दिधला.
अन्यायरुपी गोष्टी कमी होण्यासाठी,
जगण्याला मुलभुत हक्काचा आधार दिधला.
अनेक देशांकडून त्यांच्या राज्यघटनांचा
चांगुलपणा घेतला.
आजच्या घडीला बाबासाहेबांमुळे
संविधान एक
देशाचा मार्गदर्शक बनला.
Comments